22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रपाकिस्तानात कांदा आणि टोमॅटोची निर्यात करा, अनिल घनवटांचे पंतप्रधानांना पत्र

पाकिस्तानात कांदा आणि टोमॅटोची निर्यात करा, अनिल घनवटांचे पंतप्रधानांना पत्र

एकमत ऑनलाईन

मुंबई : सध्या पाकिस्तानात पुराने थैमान घातले आहे. पुरामुळे पाकिस्तानातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे आरोग्याच्या संकटाबरोबरच अन्नधान्याच्या टंचाईची समस्या देखील निर्माण झाली आहे. पुरामुळे येथील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानात प्रचंड महागाई वाढली आहे. त्यामुळे पाकिस्तानात कांदा आणि टोमॅटोची निर्यात त्वरित सुरू करावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीने केली आहे.

पाकिस्तानात कांद्याचे दर प्रचंड वाढले आहेत. पुरामुळे तेथील महागाईत वाढ झाली आहे. त्यामुळे भारतातून कांदा आणि टोमॅटोची आयात करण्याची मागणी होत आहे. भारताने तातडीने निर्यात सुरू करून भारतातील कांदा आणि टोमॅटो उत्पादक शेतक-यांना दिलासा द्यावा अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली केली आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

पाकिस्तानात कांदा ४०० रुपये प्रति किलो तर टोमॅटो ५०० रुपयांवर!
पाकिस्तानात अतिवृष्टी आणि महापुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी पाकिस्तानात कांद्याचे दर ४०० रुपये प्रति किलो तर टोमॅटोचे दर हे ५०० रुपये प्रति किलो झाले आहेत. हे दर ७०० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानातील व्यापारी वर्ग, भारतातून कांदा आणि टोमॅटोची आयात करण्याची मागणी पाकिस्तान सरकारकडे करत आहेत. भारतात मात्र कांद्याचे आणि टोमॅटोचे दर हे अद्यापही उत्पादन खर्चापेक्षा कमी आहेत.

अशा परिस्थितीत भारताने पाकिस्तानला कांदा आणि टोमॅटोची निर्यात करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी भारतातील शेतक-यांच्या वतीने केंद्र शासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती अनिल घनवट यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या