26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeराष्ट्रीयपाच कोटींचे बक्षीस असलेल्या वॉँटेडला बेड्या

पाच कोटींचे बक्षीस असलेल्या वॉँटेडला बेड्या

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन महिलेच्या हत्येप्रकरणी फरार झालेला भारतीय नागरिक राजविंदरला अखेर दिल्ली पोलिसांनी शिताफीने अटक केली.

इनिसफेलमध्ये रुग्णालयात काम करणा-या राजविंदरने २०१८ मध्ये टोयाह कॉर्डिंग्ले या ऑस्ट्रेलियातील महिलेची क्विन्सलँडमध्ये हत्या केली होती. २४ वर्षीय कॉर्डिंग्ले ही ऑस्ट्रेलियाच्या केर्न्सहून ४० किमी अंतरावर वांगेटी बीचवर श्वानासोबत फिरण्यासाठी आली होती. तेव्हा राजविंदरने तिची हत्या केली होती.

हत्येच्या २ दिवसांनंतर राजविंदर पत्नी-मुलांसह नोकरी सोडून २२ ऑक्टोबर २०१८ ला भारतात पळून आला होता. त्याने २३ ऑक्टोबरला सिडनीहून भारताच्या दिशेने उड्डाण केले होते.

पाच कोटींचे बक्षीस
क्वीन्सलँड पोलिसांनी गेल्या महिन्यात राजविंदरची माहिती देणा-याला १ दशलक्ष डॉलरचे बक्षीस ठेवले होते. हे क्विन्सलँड पोलिसांनी आतापर्यंत ठेवलेले सर्वात मोठे बक्षीस होते. ऑस्ट्रेलियन सरकारने मार्च २०२१ मध्ये भारताकडे राजविदर सिगच्या प्रत्यार्पणाची विनंती केली होती. त्याला नोव्हेंबरमध्ये मंजुरी मिळाली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यसााठी महिन्यात पंजाबी व ंिहदी अवगत असणारे ऑस्ट्रेलियन पोलिस भारतात आले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या