23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeपरभणीपाण्याच्या शोधात हरणाच्या पाडसाचा मृत्यू

पाण्याच्या शोधात हरणाच्या पाडसाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

चारठाणा : वाढत्या तापमान व पाणीटंचाईचा सामना वन्यप्राण्यांनाही करावा लागत आहे. चारठाणा परिसरातील नदी नाले, छोटे तलाव कोरडे झाल्यामुळे वन्यप्राणी सैरभैर भटकंती करीत आहेत. पाण्याच्या शोधात चारठाणा येथील शेत शिवारात हरणाच्या पाडसाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दि. १४ एप्रिल रोजी उघडकीस आली. उन्हाची तीव्रता वाढताच शेत शिवारात पाणवठे कोरडे पडत आहेत. या भागात कृत्रिम पाणवठे नसल्यामुळे वन्यप्राण्यांची भटकंती सुरू आहे. सद्य:स्थितीत पाण्याची पातळी घटली आहे.

चारठाणा येथील शिवारात गुरुवार येथील शेतकरी सचिन घाटुळ यांच्या शेतात मजूर ज्वारी काढत असताना हरणाच्या पिलाचा मृत्यू झाल्याचे दिसले. पाण्याच्या शोधात असलेल्या पिलाचा तडफडून मृत्यू झाल्याचा अंदाजे दावा मजूर करीत आहेत. या परिसरात पाण्यासाठी व चा-यासाठी हरणांचे कळप फिरतात. गेल्या आठवड्यात जिंतूर तालुक्यात पाण्याच्या शोधात निलगायी विहिरीत पडल्याची घटना घडली होती. नैसर्गिक पाणीसाठ्यात दीर्घकाळ पाणी टिकते. मात्र पाण्याचा उपसा होत असल्याने वन्य प्राण्यासाठी पाणीटंचाई निर्माण होते. दरम्यान, तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन लवकरच पाणवठे निर्माण करण्याची गरज आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या