23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeक्रीडापावसाचा विजय, मालिका बरोबरीत

पावसाचा विजय, मालिका बरोबरीत

एकमत ऑनलाईन

बंगळुरू : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज येथे पाचवा आणि शेवटचा टी-ट्वेंटी सामना होणार होता. भारताने प्रथम फलंदाजी करीत सामन्याला सुरुवातही केली होती. मात्र, ऐनवेळी पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे आजचा सामना पावसाने जिंकला. यासह मालिका २-२ अशी बरोबरीत संपली.

आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याची कट ऑफ वेळ १०:२ मिनिटे होती. परंतु तोपर्यंत पाऊस थांबला नाही आणि सामना रद्द करावा लागला. तोपर्यंत टीम इंडियाची धावसंख्या ३.३ षटकांत २८/२ होती. भारताकडून ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर नाबाद राहिले. संपूर्ण मालिकेत शानदार गोलंदाजी करणा-या भुवनेश्वर कुमारला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. या मालिकेत त्याने ६ विकेट घेतल्या. टीम इंडियाने आजचा सामना जिंकला असता तर इतिहास रचला असता. आजपर्यंत टीम इंडियाला भारतात टी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करता आलेले नाही.

दक्षिण आफ्रिका २०१५-१६ मध्ये पहिल्यांदा टी-ट्वेंटी मालिका खेळण्यासाठी भारतात आली होती. ३ सामन्यांच्या या मालिकेत भारताला २-० ने पराभवाचा सामना करावा लागला. शेवटचा टी-२० सामना पावसामुळे रद्द झाला होता. या मालिकेत संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी होता. त्याचवेळी यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ २०१९-२० मध्ये टी-२० मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली होता. ३ सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत होती आणि या मालिकेतही एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.

टीम इंडियाचे सलामीवीर फ्लॉप
टीम इंडियाचा सलामीवीर ईशान किशनने पहिल्याच षटकात केशव महाराजला २ उत्तुंग षटकार खेचले. त्यामुळे तो आज मोठी खेळी खेळणार असे वाटत होते. पण लुंगी एनगिडीने टाकलेला एक स्लो चेंडू ईशानला समजला नाही. हा चेंडू थेट यष्टींवर धडकला व ईशान तंबूत परतला. त्यानंतर ऋतुराज गायकवाडही एनगिडीच्याच चेंडूवर ड्वेन प्रिटोरियसकडे झेल देऊन तंबूत परतला. ईशानने १५ व गायकवाडने १० धावा काढल्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या