22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रपावसामुळे भाज्यांचे मोठे नुकसान; मुंबईत आवक घटली

पावसामुळे भाज्यांचे मोठे नुकसान; मुंबईत आवक घटली

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यभरात मागील आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे एकीकडे शेतीचे मोठे नुकसान झाले असताना शहरात भाज्यांचे दरही कडाडल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे मुंबईत भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. परिणामी भाज्यांचे दर ४० टक्क्यांनी वाढले आहेत.

मुंबईत राज्यातील विविध जिल्ह्यांसह इतर राज्यांमधून भाज्यांचा पुरवठा होतो. नाशिक, पुणे, गुजरातहून मुंबईत भाज्या घेऊन येणा-या गाड्या ५० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. मुंबईतल्या भाजी मार्केटमध्ये मागील आठवड्याभरापासून राज्यभरात कोसळत असलेल्या पावसामुळे आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. नाशिक, पुणे, गुजरातहून भाज्या घेऊन येणा-या गाड्या कमी झाल्या आहेत तर पावसामुळे अनेक भाज्या खराब झाल्या आहेत

पावसामुळे पालेभाज्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे जोपर्यंत पूर्वीप्रमाणे भाज्यांची आवक मार्केटमध्ये पूर्ववत होत नाही तोपर्यंत हे दर वाढलेले पाहायला मिळतील

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या