39.1 C
Latur
Wednesday, June 7, 2023
Homeराष्ट्रीयपिकअप-ट्रकच्या धडकेत पाच जण जागीच ठार, 12 प्रवासी जखमी

पिकअप-ट्रकच्या धडकेत पाच जण जागीच ठार, 12 प्रवासी जखमी

एकमत ऑनलाईन

हिसार : हरियाणाच्या हिसार जिल्यातील राजगड पासून १० किमी अंतरावर असलेल्या डोकवा गावाजवळ शनिवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास पिकअप वाहनाची ट्रकला जोरदार धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की, ५ जणांचा जागीच मृत्यू झाला व १२ जण जखमी झाले आहेत. पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

जखमींना उपचारासाठी हिसार येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सगळे जण सकाळी सालासर येथे पूजा करण्यासाठी गेले होते व रात्री १०:०० वाजता पूजा करून हे सर्वजण पिकअप वाहनातून गावाकडे जात होते.

या पिकअपमध्ये दोन कुटुंबातील १७ जण होते. मृत हे स्याहडवा आणि भिरणी गावातील रहिवासी आहेत. पिकअप चालक सोनूसह पाच जणांची प्रकृतीचिंताजनक आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी जखमींचे जबाब नोंदवून घेतले आहेत व ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या