26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeक्रीडापी. व्ही. सिंधू लढणार निवडणूक

पी. व्ही. सिंधू लढणार निवडणूक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारी सिंधू सध्या बालीमध्ये ‘सुपर १०००’ श्रेणीची इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा खेळत आहे. दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू १७ डिसेंबर रोजी स्पेनमध्ये होणा-या जागतिक चॅम्पियनशिप दरम्यान बीडब्ल्यूएफ ऍथलिट आयोगामार्फत घेण्यात येणारी निवडणूक लढणार आहे.

विश्वविजेती सिंधू सध्या बालीमध्ये ‘सुपर १०००’ श्रेणीची इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा खेळत आहे. सिंधू आणि श्रीकांत यांनी ‘सुपर ७५०’ श्रेणीच्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडिमटन स्पर्धेत उपान्त्य फेरीपर्यंत मजल मारली होती. शनिवारी या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर या दोघांनीही ‘सुपर १०००’ श्रेणीच्या इंडोनेशिया खुल्या स्पर्धेतील जेतेपदासाठी तयारी सुरू केली. बीडब्ल्यूएफ ऍथलिट आयोगाच्या निवडणुकीतील सहा पदांसाठी नामांकन भरणा-या नऊ खेळाडूंपैकी सिंधू एक आहे.

बॅडमिंटन खेळासंदर्भातील आघाडीची संस्था असणा-या बीडब्ल्यूएफ ऍथलिट आयोगाने एका पत्रकामध्ये, ‘‘ऍथलिट आयोग (२०२१ पासून २०२५ कालावधीसाठी) निवडणुका १७ डिसेंबर २०२१ रोजी संपूर्ण ताकदीने बिडब्ल्यूएफ विश्व चॅम्पियनशिपसोबत स्पेनमध्ये होणार आहेत.’’

दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारी सिंधू सध्या पुन्हा निवडणुकीला उभी राहणारी एकमेव खेळाडू आहे. तिने यापूर्वी २०१७ मध्ये ही निवडणूक लढली होती. सध्याच्या कार्यकाळामध्ये सिंधू ही सहा महिला प्रतिनिधींपैकी एक होती, असेही आयोगाने स्पष्ट केलेय.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या