28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रपुणेकरांनी अडवला मुख्यमंत्र्यांचा ताफा

पुणेकरांनी अडवला मुख्यमंत्र्यांचा ताफा

एकमत ऑनलाईन

चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचे गा-हाणे थेट मुख्यमंत्र्यांकडे
पुणे : पुण्यातील चांदणी चौकात पुणेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला. काल रात्री (२६ ऑगस्ट) ही घटना घडली. पुणेकरांना रोज चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक नागरिकांचा वेळ वाया जातो. त्यामुळे पुणेकरांनी थेट मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला आणि वाहतूक कोंडीचे गा-हाणे मांडले . स्थानिकांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदनदेखील दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्याच्या चांदणी चौकातील हायवेवरून साता-याला जात होते. त्यावेळी चांदणी चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफादेखील वाहतूक कोंडीत अडकला. शहरात सर्व ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. अनेकांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीवर मार्ग काढा. काहीतरी ठोस नियोजन करा.

या मार्गावर तासन्तास वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात, यावर तोडगा काढा,अशी मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मुंबई-बंगळुरू हायवेवर रोज अनेकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यात सगळ्यात महत्त्वाचा टप्पा जो पुण्यातील चांदणी चौकाकडे येतो त्या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा असतात. त्यामुळे अनेक नागरिक गेले काही महिने या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहेत. यापूर्वी देखील पुणेकरांनी पुणे प्रशासनाकडे या वाहतूक कोंडीचे गा-हाणे मांडले होते. मात्र याकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने पुणेकरांनी थेट मुख्यमंत्र्यांना गाठले आहे.

पुणे शहरातील चांदणी चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम सुरू आहे. त्यामुळे ही वाहतूक कोंडी होत आहे. मुख्यमंत्र्यांनी या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याचा आदेश दिला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे अधिकारी आज या मार्गाची पाहणी करणार आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने पुणेकरांची महत्त्वाची म्हणजेच वाहतूक कोंडीची समस्या कितपत सुटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सुप्रिया सुळेंचे थेट नितीन गडकरींकडे गा-हाणे
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पुणेकरांसाठी खास मागणी केली होती. पुणेकरांच्या वाहतूक समस्येवर भाष्य केले होते. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गानंतर आता पुणे-सातारा महामार्गावर नागरिकांना येणा-या वाहतूक कोंडीसारख्या समस्यांवर तोडगा काढा, अशी मागणी त्यांनी केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या