21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रपुण्यात १५०लीटर भेसळयुक्त तूप जप्त

पुण्यात १५०लीटर भेसळयुक्त तूप जप्त

एकमत ऑनलाईन

पुणे : सणासुदीचे दिवस सुरु झालेत. अशातच स्वयंपाकाला वापरण्यासाठी सर्रास वापरले जााणार तूप हे भेसळयुक्त असण्याची भीती व्यक्त केली जातेय. नुकतीच पुण्यात मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये १५० लीटर तूप जप्त करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत १५० लीटर तूप भेसळयुक्त असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे बाजारात तुपावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून तुमच्या स्वयंपाक घरातील तूप भेसळयुक्त तर नाही ना, अशीही शंका घेतली जाते आहे. पुणे अन्न आणि औषध प्रशासनासोबत पोलिसांच्या संयुक्त सहकार्याने ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांसह अन्न आणि औषध प्रशासन पुढील तपास करत आहेत.

पुण्यातील कात्रज भागात धाड टाकत १५० लिटर भेसळयुक्त तूप पकडण्यात आले. अन्न आणि औषध प्रशासनासोबत मंगळवारी पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. डालडा आणि जेमिनीचे तेल एकत्र करुन तुपाची भेसळ केली जात होती. तसेच या कारवाईदरम्यान, अनेक केमिकलयुक्त पदार्थही आढळून आले आहे. आता ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या