नाशिक : भारतीय लोकांना सोन्या-चांदीचे आकर्षण असते. सण, उत्सव, समारंभ प्रसंगी सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. तसेच उत्तम गुंतवणूक म्हणूनही सोने-चांदीचा विचार केला जातो.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर रोजच्या रोज बदलत असतात. नाशिकमधील बाजारपेठेतही सोन्या-चांदीच्या दरात दररोज चढ-उतार होत असतात. नाशिकमध्ये आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
बुधवारी २४ कॅरेट प्रति तोळा सोन्याचा दर ५७ हजार ९०० रुपये होता. आज तोच दर ५८ हजार ४५० रुपयांवर गेला आहे. यामुळे तोळ्यामागे ५५० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच बुधवारी २२ कॅरेट प्रति तोळा सोन्याचा दर हा ५३ हजार ८० रुपये होता. आज तोच दर ५३ हजार ५८० रुपयांवर गेला आहे. यामुळे तोळ्यामागे ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आज सोन्याचे दागिने घेण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.