19.6 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeराष्ट्रीयपेट्रोल-डिझेल दरात आजही झाली वाढ

पेट्रोल-डिझेल दरात आजही झाली वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने आपले डोके वर काढले आहे. गेल्या साधारण दोन आठवड्यांपासून जवळपास दररोजच ८० पैशांनी इंधनाचे दर वाढत असून, सामान्यांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली आहे. पेट्रोलचे दर ७५ ते ८४ पैशांनी वाढले आहेत. तर डिझेलचे दर देखील ७६ ते ८५ पैशांनी वाढले आहेत. दिल्लीमध्ये एक लीटर पेट्रोल १०३.४१ रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर ९४.६७ रुपये प्रति लीटर मिळत आहे.

मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत ११८.४१ रुपये तर डिझेलची किंमत १०२.६४ रुपये प्रति लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर ११३.०३ रुपये झाला आहे तर डिझेलचे दर ९७.८२ रुपये प्रति लीटर झाला आहे. चेन्नईमध्ये देखील पेट्रोल महागले असून १०८.९६ रुपये प्रती लीटर झाले आहे. तर डिझेल ९९.०४ रुपये प्रति लीटर झाले आहे. विरोधकांनी असा आरोप केला आहे की, पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे मोदी सरकारने तेल कंपन्यांना पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवण्यापासून थांबवलं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचा भाव ११२ डॉलर प्रति बॅरल पोहोचल्यानंतर रविवारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली होती.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या