26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeऔरंगाबादपैठणमध्ये आदित्य ठाकरेंचे जोरदार स्वागत ; बंडखोर आ. भुमरे यांना निवडून येण्याचे...

पैठणमध्ये आदित्य ठाकरेंचे जोरदार स्वागत ; बंडखोर आ. भुमरे यांना निवडून येण्याचे दिले आव्हान

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे. पैठण तालुक्यामधील बिडकीन येथे आदित्य यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पैठणमधून पाच वेळेस निवडून आलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार संदिपान भुमरे यांच्यावर आदित्य ठाकरेंनी टीका केली.

आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसंवाद यात्रेला नाशिक व आता औरंगाबादमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लोक शिवसेनेच्या मागे उभे असल्याचे या यात्रेतून स्पष्ट होत आहे. पैठणमधील बंडखोर आमदारांना उद्देशून मला एवढेच सांगायचे आहे की, गद्दार म्हणूनच राहायचे असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा व पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे.

औरंगाबाद जिल्ह्यातील पाचही बंडखोर आमदारांना उद्देशून आदित्य ठाकरे म्हणाले, गेला तर जा, जिकडे आहात तिकडे सुखात राहा. पण पदाचे राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा. मी तुमच्यावर आसूड उगारणार नाही, जनताच तुमचा निर्णय घेईल.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या पैठण येथील मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तूनही आ. संदिपान भुमरेंवर टीका करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, संत एकनाथ साखर कारखान्यावर ‘स्लीप बॉय’ म्हणून किरकोळ पगारावर नोकरी करणा-या संदिपान भुमरे यांना शिवसेनेने अक्षरश: भरभरून दिले. सुरुवातीला कारखाना संचालक, पंचायत समितीचे सदस्य व उपसभापती असा त्यांचा राजकीय विकास झाला. तरीही संदिपान भुमरे यांना गद्दारीची अवदसा आठवली. संदिपान भुमरे यांच्या गद्दारीबद्दल पैठणकरांमध्ये संताप आहे, रोष आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या