गडचिरोली : गडचिरोलीत धक्कादायक घटना घडली आहे. गावापासून दूर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणा-या तरुणाला नक्षलवाद्यांनी ठार केले. हा तरुण गावाला होळीचा सण साजरा करायला आला होता.
मात्र हा सण त्या तरुणाच्या आयुष्यातील शेवटचा सण ठरला. स्पर्धा परीक्षा पास करून अधिकारी होण्याचे त्या तरुणाचे स्वप्न होते. तरुणासोबत त्याचे स्वप्न देखील नक्षलवाद्यांनी नष्ट केले.
नक्षलवाद्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या एका उच्चशिक्षित तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साईनाथ नरोटे (वय २६) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
मृत साईनाथ नरोटे भामरागड तालुक्यातील मर्दहुर गावचा रहिवासी होता. पोलिसांचा खब-या असल्याच्या संशयावरून त्याचा खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.