26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeराष्ट्रीयप्रदूषणाच्या मुद्यावरून केंद्राला ‘सर्वोच्च’ फटकार

प्रदूषणाच्या मुद्यावरून केंद्राला ‘सर्वोच्च’ फटकार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये दिवसेंदिवस प्रदूषणाची पातळी गंभीर होत असताना या मुद्यांवर आता थेट सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी तण जाळत असल्यामुळे दिल्लीमध्ये प्रदूषणाची पातळी वाढल्याचा दावा केला जात आहे.

या शेतक-यांना तण हटवण्यासाठी यंत्रसामग्री पुरवण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून, त्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने या मुद्यावरून केंद्र सरकार आणि प्रशासनाला परखड शब्दांमध्ये फटकारले आहे. तसेच, या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने याचिकेच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकार आणि प्रशासनाला परखड सवाल केले आहेत. या मुद्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही कॉमन सेन्स वापरतो आहोत. पण केंद्र सरकार आणि प्रशासन नेमके करत आहे? प्रत्यक्ष शेतावर जाऊन, शेतक-यांशी चर्चा करून, वैज्ञानिकांसोबत बोलून या तण जाळण्याच्या मुद्यावर कायमस्वरूपी तोडगा सरकार का काढत नाही? असा सवाल न्यायालयाने यावेळी उपस्थित केला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या