23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयप्रदूषणामुळे दरवर्षी ९० लाख लोकांचा बळी

प्रदूषणामुळे दरवर्षी ९० लाख लोकांचा बळी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : प्रदूषणाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. हे संकट केवळ भारतापुरते मर्यादित नाही, तर जगालाचा हा प्रश्न भेडसावत आहे. जागतिक स्तरावर दरवर्षी तब्बल ९ दशलक्ष (९० लाख) लोक सर्व प्रकारच्या प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडतात, अशी माहिती एका नव्या अभ्यासातून समोर आली आहे. विशेष म्हणजे मागच्या २२ वर्षांत दूषित हवेमुळे मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे या अहवालात नमदू करण्यात आले आहे.

प्रदूषणाचे संकट मोठ्या प्रमाणात वाढले असून, संपूर्ण जगाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस चिंता वाढत चालली आहे. धक्कादायक बाब म्हणजे २००० सालापासून कार, ट्रक आणि उद्योगातील दूषित हवेमुळे मृत्यूची संख्या तब्बल ५५ टक्क्यांनी वाढली आहे. ‘द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नल’मधील नवीन अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. त्यात युनायटेड स्टेट्स अव्वल १० राष्ट्रांमध्ये एकमेव परिपूर्ण औद्योगिक देश आहे. विशेष म्हणजे अमेरिकेतही प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूची संख्या जास्त आहे. बांगला देश आणि इथिओपिया हे दोन्ही देश १ लाख ४२ हजार ८८३ मृत्यूंसह सातव्या क्रमांकावर आहेत.

कोळशावर आधारित वीज प्रकल्प, स्टील कारखाने यासारखे स्थिर स्त्रोत आणि कार, ट्रक व बस हेदेखील वायू प्रदूषणासाठी कारणीभूत ठरले आहेत. ही एक मोठी जागतिक समस्या असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. भारतात नवी दिल्ली येथे हिवाळ््यात वायू प्रदूषण शिखरावर असते. गेल्यावर्षी केवळ दोन दिवस दिल्ली शहरातील हवा प्रदूषित नव्हती. ४ वर्षांत पहिल्यांदाच असे घडले, अन्यथा सातत्याने हिवाळ््यात वायू प्रदूषणाचा स्तर कायम चिंताजनक असतो.

जगभर रस्त्यावर धावणा-या वाहनांची संख्या वाढत आहे. त्यातून वायू प्रदूषणात अधिक भर पडत आहे आणि यातून विविध आजार उद्भवत असून, मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. विशेषत: वाहने आणि ऊर्जा निर्मितीतून विषारी वायूचे उत्सर्जन वाढत आहे असा याचा अर्थ होतो, असेही या अभ्यासात नमूद आहे. तसेच गावखेड्यांमध्येही प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वच देशांतील व्यवस्थेला वायू प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलावी लागणार आहेत.

वायू प्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक
वायू प्रदूषणाचा धोका अधिक वाढला असून, इतर प्रदूषणापेक्षा वायू प्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. त्यात एकूण मृत्यूंपैकी तीन चतुर्थाश मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. जागतिक स्तरावर याबाबत अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच भारतातही वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, याचा विळखा अधिक वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

भारत, चीन आघाडीवर
प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूंमध्ये भारत आणि चीन जगात आघाडीवर आहेत. भारत आणि चीन या दोन्ही देशात वर्षांला अनुक्रमे २.४ दशलक्ष आणि २.२ दशलक्ष मृत्यू होतात. विशेष म्हणजे, भारत आणि चीन या दोन देशांमध्ये जगातील सर्वात मोठी लोकसंख्यादेखील आहे. २०१९ मध्ये तर सर्व प्रकारच्या प्रदूषाणामध्ये भारतात २४ लाख लोकांनी प्राण गमावले. या २४ लाखांपैकी वायू प्रदूषणामुळे मरण पावलेल्यांची संख्या १६ लाख इतकी असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला. याची चिंता अधिक भेडसावत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या