37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeराष्ट्रीयप्रभा अत्रे यांना पद्विभूषण

प्रभा अत्रे यांना पद्विभूषण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २०२२ च्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांच्यासह ४ जणांना राष्ट्रीय स्तरावरील दुस-या क्रमांकाचा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला. यामध्ये जनरल बिपीन रावत, माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग आणि प्रसिद्ध साहित्यिक राधेश्याम खेमका यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झाला. यासोबतच १७ जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पद्मश्री पुरस्कार १०७ जणांना जाहीर झाला आहे. पद्मविभूषण पुरस्कारामध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, जनरल बिपिन रावत आणि राधेश्याम खेमका या तिघांनाही मरणोत्तर पद्मविभूषण देण्यात आला आहे.

पद्मविभूषणमध्ये कला क्षेत्रातून प्रभा अत्रे, साहित्य क्षेत्रातून राधेश्याम खेमका (मरणोत्तर), संरक्षण क्षेत्रामधून बिपिन रावत (मरणोत्तर), सार्वजनिक कार्यासाठी कल्याणसिंग (मरणोत्तर) यांना पुरस्कार जाहीर झाला. यासोबतच मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, सीरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, व्हीक्टर बॅनर्जी, देवेंद्र झांजरिया, राशिद खान, गुरमित बावा (मरणोत्तर), नटराजन चंद्रशेखरन, क्रिष्ण इला आणि सुचित्रा इला, मधुर जेफरी, राजीव मेहेरश्री, संजया राजाराम (मरणोत्तर), प्रतिभा रे, स्वामी सच्चिदानंद आणि वसिष्ठ त्रिपाठी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

याशिवाय एकूण १०७ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून, यामध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, प्रमोद भगत, वंदना कटारिया, गायक सोनू निगम, ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण, डॉ. भीमसेन सिंघल, डॉ. विजयकुमार डोंगरे, डॉ. बालाजी तांबे (मरणोत्तर), डॉ. हिंमतराव बाविस्कर आदींचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील १० मानकरी
केंद्र शासनाने आज पद्म पुरस्कार जाहीर झाला असून, यामध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण, सायरस पुनावाला आणि उद्योगपती नटराजन चंद्रशेखरन यांना पद्मभूषण आणि ज्येष्ठ लोककला गायिका सुलोचना चव्हाण, डॉ. हिंमतराव बाविस्कर, सोनू निगम, डॉ. विजयकुमार डोंगरे, डॉ. भीमसेन सिंघल, अनिलकुमार राजवंशी यांचा समावेश असून, यांना विज्ञान आणि अभियांत्रिकीसाठी, तर दिवंगत आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री जाहीर झाला. या १० पद्म पुरस्कार विजेत्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.

प्रभा अत्रे प्रतिभावंत गायिका
प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक आहे. ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांना दुस-या क्रमांकाचा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला.

 

 

 

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या