26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रप्रहार मधला ‘प्र’ कधीच निघून गेलाय

प्रहार मधला ‘प्र’ कधीच निघून गेलाय

एकमत ऑनलाईन

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद काही शमण्याची चिन्हं नाहीत. ‘प्रहार’ मधून नारायण राणे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. नारायण राणेंच्या या टीकेला आता शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी राणेंना प्रत्युत्तर दिले. शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीत नारायण राणेंमुळे कुठलाही तोटा होणार नसल्याचा दावाही गो-हे यांनी केला आहे.

हार की प्रहार? प्रहार मधील ‘प्र’ कधीच निघून गेलाय. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुखपत्राचं नाव हार ठेवावं, असा खोचक टोलाही नीलम गो-हे यांनी लगावला आहे. त्याचबरोबर मुंबई महापालिका निवडणुकीत नारायण राणेंमुळे शून्यही तोटा होणार नाही, असेही त्या म्हणाल्या. राणे यांनी समतोल राखून बोललं पाहिजे, असा इशाराही गो-हे यांनी यावेळी दिला.

सोमय्या कर्णबधिर आणि दृष्टीहीन
सोमय्या हे कर्णबधिर आणि दृष्टीहीन आहेत. ते पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संदर्भात चौकशी करण्याची मागणी करणार नाहीत. खासदार संजय राऊत यांनी जी भूमिका घेतली तीच माझी भूमिका आहे, असे त्या म्हणाल्या. रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबत बोलताना महिला आयोगाला अध्यक्षपद मिळालं ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र, हे पद सर्वधर्म समभावाचं आहे. पक्षाची राजकीय भूमिका असते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या