इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये नव्याने सामील झालेले लखनौ व गुजरात या दोन्ही संघांनी या हंगामात चमकदार कामगिरी केली. त्यामुळेच हे दोन्ही संघ गुणतालिकेत टॉप ४ संघांमध्ये आहेत. दोन्ही संघात मंगळवारी आयपीएल २०२२चा ५७वा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर खेळवला गेला.या सामन्यात गुजरातकडून फलंदाजी करताना कर्णधार हार्दिक पंड्या बाद झाल्यानंतर जोरदार ट्रोल होत आहे.या सामन्यात लखनौ संघाविरुद्ध गुजरातने नाणेफेक ंिजकुन फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातला २० षटकात ४ बाद १४४ धावा जमवता आल्या पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या गुजरातची सुरुवात खूपच निराशाजनक राहिली. त्यांचे दोन महत्त्वाचे खेळाडू ४.२ षटकात तंबूत परतले. यावेळी वृद्धिमान साहा (५) तिस-या षटकात आणि मॅथ्यू वेड (१० ) पाचव्या षटकात माघारी परतला. यानंतर शुबमन गिलने डाव सांभाळला आणि आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्यात मोलाचा वाटा उचलला.त्यांने ४९ चेंडूत ७ चौकारांसह सर्वाधिक नाबाद ६३ धावा केल्या., हंगामात सुरुवातीला चांगल्या फॉर्ममध्ये असलेला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कर्णधार हार्दिक पंड्या १३ चेंडूत ११ धावा करत बाद झाला. तो बाद होताच नेटक-यांनी त्याला ट्विटरवर ट्रोल करायला सुरुवात केली लखनौकडून गोलंदाजी करताना आवेश खानने ४ षटकात २६ धावात ४ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त मोहसिन खान आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
हा सामना गुजरात संघाने ६२ धावांनी ंिजकला. हा गुजरातचा नववा विजय होता. विशेष म्हणजे, या विजयासह गुजरातने प्लेऑफमध्ये एन्ट्री केली आहे. या सामन्यात शुबमन गिलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. १४४ धावाच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौ ८२ धावांवर सर्वबाद झाला लखनौकडून फलंदाजी करताना एकट्या दीपक हुड्डाने २६ चेंडूत २७ धावा केल्याकिं्वटन डी कॉकला ११ धावा करता आल्या. कर्णधार केएल राहुल फक्त ८ धावा करून तंबूत परतला. गुजरातकडून गोलंदाजी करताना राशिद खानने ४ षटकात ३० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. यश दयाल आणि साईकिशोरने प्रत्येकी २ विकेट्स शमीने १ विकेट आपल्या नावावर केली. या विजयासह गुजरात संघाने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वलस्थान पटकावले. या विजयानंतर त्यांचे गुण १८ झाले आहेत. तसेच, गुजरात हा प्लेऑफमध्ये पोहोचणारा आयपीएल २०२२मधील पहिला संघ ठरला आहे.
– डॉ. राजेंद्र भस्मे
कोल्हापूर, मो. ९४२२४ १९४२८