26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रफडणवीस यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

फडणवीस यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. राज ठाकरे हे आपल्या नव्या घरात शिफ्ट झाल्यानंतर प्रथमच देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या घरी दाखल झाले होते. दरम्यान या दोन्ही नेत्यांमधील बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतीर्थवर दाखल झाले होते. ही एक कौटुंबिक भेट असल्याचे बोलले जात असले तरी या भेटीला केवळ कौटुंबिक भेट बोलता येणार नाही. कारण, गेल्या काही दिवसांत राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या संदर्भात घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. यासोबतच मनसे आणि भाजप यांची आगामी मुंबई मनपाच्या निवडणुकांत युती होण्याचीही गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत आहेत. तसेच राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनही करत आहेत. सध्या राज्यात सुरू असलेला एसटी कर्मचा-यांचा संप यावरही अद्याप तोडगा निघालेला नाहीये आणि एसटी कर्मचा-यांनी राज ठाकरेंची भेटही घेतली होती. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात या एसटी कर्मचा-यांच्या प्रश्नावरसुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या