18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीयफिफात धक्कादायक निकालांचे सूत्र कायम : जपानचा जर्मनीवर २-१ ने रोमहर्षक विजय

फिफात धक्कादायक निकालांचे सूत्र कायम : जपानचा जर्मनीवर २-१ ने रोमहर्षक विजय

एकमत ऑनलाईन

दोहा : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी अर्जेंटिनावर सौदी अरेबियाने विजय मिळवल्यानंतर जपानने जर्मनीला नमवत एक आणखी एक उलटफेर केला.

फीफा रँकिंगमध्ये ११ व्या स्थानी असलेल्या जर्मनीला २४ व्या स्थानावरील जपानने २-१ ने मात दिली. विशेष म्हणजे ७४ मिनिटांपर्यंत जर्मनीचा संघ १-० ने आघाडीवर होता. पण ७५ आणि लगेचच ८३ व्या मिनिटाला जपानने लागोपाठ २ गोल करत रोमहर्षक विजयाची नोंद केली.

अर्जेंटिना संघाला जशी सौदी अरेबियाने मात दिली, तसाच काहीसा सामना आज पाहायला मिळाला. अर्जेंटिनाप्रमाणे जर्मनीनेही हाल्फ टाईमपूर्वी पेनल्टीच्या मदतीने गोल केला होता. तर हाल्फ टाईमनंतर सौदीप्रमाणे जपाननेही दोन गोल करत विजय मिळवला.

सामना सुरु होण्यापूर्वी जर्मनीचा यंदाचा स्कॉड पाहता ते सहज सामना जिंकतील असे वाटत होते. सुरुवातीपासून चंडूवर पकड बनवली होती. तब्बल ७४ टक्के पजेशन जर्मनीकडे होते. तर २६ टक्के पजेशनच्या जोरावर जपानने दोन गोल करत सामनाही जिंकला. जर्मनीकडून इटलाय गुंडोगनने ३३ व्या मिनिटाला पेनल्टीच्या मदतीने पहिला गोल केला.

हाल्फ टाईमपर्यंत दोन्ही संघानी एकही गोल केला नाही. हाल्फ टाईमनंतरही दोन्ही संघाकडून प्रयत्न होत होते पण ते गोलमध्ये बदलत नव्हते. ७४ मिनिटे झाली तरी १-० स्कोर असल्याने जर्मनी जिंकणार असेच वाटत होते. पण ७५ व्या मिनिटाला रिस्टू डोआने जपानसाठी पहिला गोल करत बरोबरी साधली. मात्र जपानने जोरदार आक्रमणे केली आणि ८३ व्या मिनिटाला टुकुमी मिनामिनो याने गोल करत जपानला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ९० मिनिटे होऊन अतिरिक्त वेळेतही जर्मनी गोल करु शकली नाही आणि सामना जपानने खिशात घातला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या