22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeउद्योगजगतअदानी-अंबानी पुन्हा आमने-सामने

अदानी-अंबानी पुन्हा आमने-सामने

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिवाळखोरीत निघालेल्या फ्यूचर रिटेल लि.चे अधिग्रहण करण्यासाठी निर्माण झालेल्या वर्चस्वाच्या शर्यतीत उद्योगपती गौतम अदानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी पुन्हा आमने- सामने आले आहेत.

फ्यूचर रिटेलचा ताबा घेण्यासाठी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज आणि फ्लेमिंगो ग्रुप यांच्यातील संयुक्त उपक्रम मून रिटेल प्रायव्हेट लिमिटेड, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स आणि अन्य १३ कंपन्यांनी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट दाखल केले आहे.
अदानी- अंबानींसह इतर कंपन्यांमध्ये शालिमार कॉर्पोरेशन लिमिटेड, नलवा स्टील अँड पॉवर, युनायटेड बायोटेक, डब्ल्यूएचस्मिथ ट्रॅव्हल, कॅप्री ग्लोबल होल्डिंग्ज यांचा समावेश आहे.

एके काळी देशातील दुसरी रिटेल कंपनी फ्यूचरवर ३३ लेंडर्सनी सुमारे २१०.६ अब्ज रुपयांच्या कर्जाचे दावे केले होते. या प्रमुख कर्जदारांमध्ये बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे. मधल्या काळात फ्युचर रिटेलला त्यांची मालमत्ता रिलायन्स इंडस्ट्रीजला ३.४ बिलियन डॉलर्समध्ये विकायची होती. परंतु अमेझॉनच्या कायदेशीर आव्हानामुळे ते शक्य होऊ शकले नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या