22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeतंत्रज्ञानबंगळूरूत अ‍ॅपलचा निर्मिती प्रकल्प लवकरच

बंगळूरूत अ‍ॅपलचा निर्मिती प्रकल्प लवकरच

एकमत ऑनलाईन

बंगळूरू : बेंगलोरजवळच्या होसुरमध्ये अ‍ॅपलच्या आयफोनची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे देशातील ६० हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

मंगळवारी एका जाहिर कार्यक्रमात याचे संकेत देताना ते म्हणाले, यासाठी झारखंडची राजधानी रांची आणि हजारीबाग येथील सहा हजार आदिवासी महिलांना आयफोन तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात त्यांना रोजगार मिळणार आहे. त्यानंतर दुस-या टप्प्यात कर्नाटकसह देशभरातील ६० तरुणांना या प्रकल्पात रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.

टाटा इलेक्ट्रॉनिक्सकडे टेंडर
बंगळूरू येथे तयार होणा-या आयफोनचे टेंडर टाटा इलेक्ट्रॉनिक्सला मिळाले आहे. होसूरमध्ये प्लांट असलेल्या टाटा इलेक्ट्रॉनिक्ससोबत अ‍ॅपल कंपनीने आयफोन निर्मितीचा करार केला आहे. टाटासह अ‍ॅपल फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉनच्या मदतीने आयफोन निर्मिती करणार आहे. भारतामधून एप्रिलनंतर पाच महिन्यांत एक बिलियन डॉलरपेक्षा जास्त किमतीच्या फोनची निर्यात झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्मितीमध्ये भारत नवीन शक्ती म्हणून उदयास येत आहे. भविष्यात भारत चीनलाही मागे टाकू शकतो, अशी शक्यताही केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी व्यक्त केली.

आयफोन निर्यातीत होणार दुपटीने वाढ
अ‍ॅपल कंपनी जास्तीत जास्त आयफोन चीनमध्ये तयार करते. पण तेथील बंधनांमुळे अ‍ॅपलने धोरणांमध्ये बदल करीत चीन एवजी भारताला पंसती दर्शवली आहे. सध्याच्या स्थितीत मार्च २०२२ पर्यंत भारतामधून १.३ बिलियन डॉलर मूल्यांची आयफोनची निर्यात झाली होती. यातील बहुतांश निर्यात युरोप आणि मध्ये पूर्व देशांमध्ये झाली होती. मार्च २०२३ पर्यंत आयफोनची भारतामधील निर्यात २.५ बिलियन डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या