मुंबई: आज शिंदे सरकारची बहुमत चाचणी होणार होती मात्र बहुमत चाचणीपूर्वीच शिवसेनेला आणखी एक धक्का बसला. शिवसेनेचे ंिहगोलीचे आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सहभागी झाले.बांगर यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.
विशेष म्हणजे काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संतोष बांगर यांनी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान केले. मात्र आज बहुमत चाचणीपूर्वीच ते शिंदेंच्या गटात सहभागी झाले आहेत.
संतोष बांगर यांनी तब्बल १३ दिवसांनी बंडखोरी केली आहे. संतोष बांगर यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बांगर यांनी बंडखोरांवर सडकून टीका केली होती. तसेच त्यांना परत येण्याचे आवाहन केले होते. मात्र आता बांगर हेच शिंदे गटात सहभागी झाले आहेत.