29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeराष्ट्रीयबडतर्फ कामगारांनी संधी गमावली

बडतर्फ कामगारांनी संधी गमावली

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राज्यातील एसटी कर्मचा-यांचा संप अजूनही मिटण्याचे नाव घेत नाही. काही कर्मचारी कामावर रूजू झाले असले तरी बहुतांश कर्मचारी अद्यापही आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने अनेक कर्मचा-यांवर सेवा समाप्ती, बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आता बडतर्फ कर्मचा-यांना पुन्हा कामावर घेता येत नाही, असे नमूद करत संपावर ठाम असणा-या कामगारांना इशारा दिला आहे.

संप सुरू झाला, तेव्हा पटावर ९२ हजार कर्मचारी होते. त्यानंतर रोजंदारीवर असलेल्या २००० लोकांची सेवासमाप्ती झाली. कालपर्यंत (१३ जानेवारी) ३१०० कर्मचारी सेवेतून बडतर्फ झाले. साधारणत: या काळात संप केल्याने आणि इतर काही कारणाने आम्हाला ५००० कर्मचा-यांच्या सेवा समाप्त कराव्या लागल्या. साधारणत: ८७ ते ८८ हजार कर्मचारी आता पटावर आहेत. यापैकी २६ हजार ५०० कर्मचारी आता कामावर आहेत, असे चन्ने यांनी सांगितले. यावेळी बडतर्फ कर्मचा-यांच्या वापसीचा काही मार्ग आहे का, असे विचारले असता चन्ने यांनी बडतर्फ कामगारांना पुन्हा सेवेत घेता येत नाही, असे म्हणत गंभीर इशारा दिला.

या अगोदर परिवहन मंत्री अनिल परब यांनीही या आधी बडतर्फ झाल्यावर त्याला कामावर घेता येत नाही. ती तेवढी सोपी प्रक्रिया नाही. त्यामुळे अशा प्रकारची कारवाई त्यांच्यावर करण्याची वेळ येऊ नये, म्हणून त्यांनी रूजू व्हावे, असे म्हटले होते. दरम्यान, ब-याचशा कर्मचा-यांची कामावर हजर होण्याची इच्छा आहे. ते रुजू होत आहेत. सध्या महाराष्ट्रात सकारात्मक चित्र दिसून येत आहे, असे शेखर चन्ने यांनी नमूद केले.

७५० खासगी चालक कंत्राटी पद्धतीने घेणार
आता ७५० खासगी चालक कंत्राटी पद्धतीने घेण्यात येत आहेत. जे सेवानिवृत्त झाले आहेत आणि ज्यांचे वय ६२ पेक्षा कमी आहे, जे फिट आहेत त्यांना काही काळ कामासाठी घेणार आहोत. एसटी सेवा प्रवाशांना मिळावी, हा खासगी चालक कंत्राटी पद्धतीने घेण्यामागचा हेतू आहे, असे चन्ने यांनी सांगितले.

५००० कर्मचा-यांच्या सेवा समाप्त
एसटी कामगारांवरील कारवाईची माहिती देताना चेन्नी यांनी संपकाळात एकूण ५ हजार कर्मचा-यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या. यामध्ये २ हजार कंत्राटी कामगार आणि ३१०० अन्य कर्मचा-यांचा समावेश आहे. सध्या साधारणत: ८७ ते ८८ हजार कर्मचारी पटावर आहेत. यापैकी २६ हजार ५०० कर्मचारीच कामावर आहेत. त्यामुळे अन्य कर्मचा-यांवरही कारवाई अटळ असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या