18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयबनावट नावाने मिळविली सैन्यात नोकरी

बनावट नावाने मिळविली सैन्यात नोकरी

एकमत ऑनलाईन

किशनगढ़ (अजमेर) : वयोमर्यादा ओलांडल्याने एका तरुणाने सैन्यात भरती होण्यासाठी बेकायदेशीर शक्कल लढवत चक्क स्वत:ला मृत घोषित केले. मृत्यूचा बनावट दाखलाही मिळविला. आधार कार्डवरील नावातही परस्पर फेरबदल करीत वयही घटविले. फसवेगिरी करीत तो सैन्यात भरतीही झाला. प्रशिक्षण घेतल्यानंतर दरमहा ५० हजाराचा पगारही मिळविला. मात्र संरक्षण मंत्रालयाच्या महासंचालनालयाला मिळालेल्या पत्राने त्याचे बिंग फुटले आणि लष्कराने तत्काळ पदच्युत केले.

एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभावी अशी घटना घडली अजमेर जिल्ह्यातील किशनगढ जवळील काकनियावास येथील देसवाली ढाणी येथे. गावातील मोईनुद्दीनचा मुलगा मोहम्मद नूर याने या प्रताप केला आहे. त्याने बनावट प्रमाणपत्राच्या आधारे आपले नाव मोहिन सिसोदिया दाखवत सैन्यात नोकरी मिळविली होती. या फसवेगिरीत त्याच्या कुटुंबासोबतच ग्रामपंचायत आणि खासगी शाळेचीही भूमिका समोर येत असून आता पोलीस त्याला बनावट कागदपत्रे मिळवून देणा-या ठगांचा शोध घेत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या