29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeराष्ट्रीयबसपाचा इच्छुक डसाडसा रडला

बसपाचा इच्छुक डसाडसा रडला

एकमत ऑनलाईन

लखनौ : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. मात्र, यामध्ये सर्वाधिक चर्चा ही उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची होत आहे. आज बसपाच्या एका इच्छुक उमेदवाराने तिकीट मिळाले नाही, म्हणून थेट पोलिस स्थानक गाठत ओक्साबोक्शी रडायला सुरुवात केली.

एवढेच नव्हे, तर त्याने थेट आत्महत्येची धमकी दिली. मुझफ्फरनगरमध्ये हा प्रकार घडला. येथील चरथावल विधानसभा मतदारसंघाचे बसपा प्रभारी अरशद राणा यांनी उमेदवारीसाठी ६७ लाख देऊनही उमेदवारी मिळाली नसल्याचा आरोप केला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या