26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयबस दरीत कोसळली, २ ठार, ४० जखमी

बस दरीत कोसळली, २ ठार, ४० जखमी

एकमत ऑनलाईन

सुरत : गुजरातमधील डांग जिल्ह्यातील सपुतारानजीक ५० प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात २ ठार, तर ४० जण जखमी झाले आहेत. भीषण दुर्घटना घडल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बसचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.

सुरतनजीकच्या अमरोली येथील एका खाजगी क्लासेसच्या विद्यार्थ्यांची सहल डांगमध्ये आली होती. सापुतारापासून काही अंतरावर डांगच्या घाटात अडीचशे फूट दरीत ही बस कोसळली. या बसमध्ये ५० जण होते. परतीचा प्रवास करीत असताना बस दरीत कोसळली.

या भीषण दुर्घटनेमुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. डांग जिल्ह्यातील पंपासरोवर, शबरीधामसारख्या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी ही सहल नेण्यात आली होती. जखमींना अहवा आणि सुरतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत केली.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या