बंगळूरू : बंगळुरुत आपल्या मुलाला जिवंत जाळणा-या व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली आहे. अकाऊंट्सवरून झालेल्या वादातून पित्याने रस्त्यातच मुलाला जिवंत जाळून टाकले. रुग्णालयात उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. १ तारखेला वाल्मिकी नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हायरल झालेल्या व्हीडीओत मुलगा अर्पित इमारतीमधून बाहेर येताना दिसत आहे. यावेळी आरोपी वडील सुरेंद्र त्याच्या मागून येतात आणि माचिसची काडी पेटवून त्याच्या अंगावर फेकतात.
मुलगा यावेळी तिथेच उभा असतो. पहिली काडी वाया गेल्यानंतर वडील दुसरी काडी पेटवून टाकतात आणि मुलाचे शरÞीर पेट घेते. यानंतर तो तसाच आरडाओरडा करत पळत जाताना दिसत आहे. स्थानिकांनी धाव घेत यावेळी आग विझवली आणि अर्पितला रुग्णालयात दाखल केले. गुरुवारी सकाळी उपचारामदरम्यान त्याचे निधन झाले.