26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमनोरंजनबाप्पा चक्क ‘पुष्पाच्या’ रुपात

बाप्पा चक्क ‘पुष्पाच्या’ रुपात

एकमत ऑनलाईन

मुंबई : सगळीकडे लाडक्या गणरायाच्या आगमनाची धांदल उडाली आहे. अनेकांनी श्री गणरायाची स्थापना केली आहे. यादिवसांत साऊथच्या चित्रपटांनी बॉलीवूडवर अधिराज्य केले आहे. त्यांचा प्रभाव कायम आहे

. सध्या गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण तयार झाले असताना बाजारात टॉलीवूडच्या पुष्पा फेम गणपती मुर्त्या हा लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्याची मोठी क्रेझ असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान्ला श्रींच्या अनोख्या ढंगातील मुर्त्यांना भक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. काही वर्षांपूर्वी अ‍ॅव्हेंजरच्या रुपातील गणरायानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. आता पुष्पा फेममध्ये समोर आलेली गणरायाची प्रतिमा भक्तांना भुलवणारी आहे.

याशिवाय प्रसिद्ध अभिनेता रामचरण याच्या रुपातील गणेश मुर्ती देखील अनेकांच्या कौतूकाचा विषय ठरला आहे. बॉलीवूडवर जसा टॉलीवूडचा प्रभाव दिसून आला तसेच गणरायाच्या लूकवर देखील टॉलीवूडची छाप पडल्याचे पाहावयास मिळत आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या