16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeबाबो...१६ महिन्यांचे बाळ निष्णात जलतरणपटू

बाबो…१६ महिन्यांचे बाळ निष्णात जलतरणपटू

एकमत ऑनलाईन

लंडन : लहानपणी पोहता आले नाही तर अनेकांना हे कौशल्य शिकावे लागते. पण निसर्गाने मानवाला, की कला जन्मजात दिली आहे, असे वैद्यक शास्त्र म्हणते. त्याला पुष्टी देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अवघ्या १६ महिन्यांचे हे बाळ निष्णात जलतरण पटूला लाजवेल अशा अंदाजात पोहताना दिसत आहे. त्यामुळे नेटक-यांमध्ये पोहणा-या या बाळाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

एका ट्विटर हँडलने या चिमुकल्या बाळाचा व्हिडिओ शेअर केला. ज्या वयामध्ये मुलांना बरोबर चालता येत नाही. त्या वयामध्ये हे १६ महिन्यांचे बाळ चांगले पोहत आहे. बाळ एक छोट्या स्विंिमगपूलमध्ये पोहत आहे. या बाळाने पुलाच्या एका टोकापासून ते दुसरा टोक सहज पोहत गाठला.

पोहल्यानंतर हे बाळ जलतरण तलावात परत उडी मारतानाही दिसले. १६ महिन्यांच्या बाळाला आसपास काय घडत आहे, याची फारशी जाण नसते. तरीही पोहताना या बाळाच्या चेह-यावर कसलीही भिती नाही. उलट ते आनंदाने पोहत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या