22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयबिल्किस बानोसंबंधीचा निर्णय भयंकर चुकीचा

बिल्किस बानोसंबंधीचा निर्णय भयंकर चुकीचा

एकमत ऑनलाईन

१३४ माजी अधिका-यांचे सरन्यायाधीशांना पत्र
नवी दिल्ली : गुजरात सरकारने अलीकडेच बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ दोषींची सुटका केली आहे. गुजरात सरकारच्या या निर्णयाचा देशभरातून अनेकांनी निषेध केला आहे. त्याचेप्रमाणे आता १३४ माजी अधिका-यांनीदेखील हा भयंकर चुकीचा निर्णय असल्याचे म्हणत सरन्यायाधीशांना पत्र पाठवले आहे. याशिवाय या माजी अधिका-यांनी सरन्यायाधीश उदय लळीत यांना हा निर्णय सुधारण्याचीदेखील विनंती केली.

बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील ११ दोषी गुजरात सरकारच्या निर्णयानंतर गोध्रा तुरुंगात १५ ऑगस्ट रोजी बाहेर आले होते. यानंतर या निर्णयावर प्रचंड टीका सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर १३४ माजी अधिका-यांनी सरन्यायाधीशांना पत्र पाठवून गुजरात सरकारने दिलेला आदेश रद्द करण्याची आणि दोषींना जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी तुरुंगात परत पाठवण्याची पत्राद्वारे विनंती केली.

दिल्लीचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर नजीब जंग, माजी कॅबिनेट सचिव के. एम. चंद्रशेखर, माजी परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन व सुजाता सिंग आणि माजी गृहसचिव जी. के. पिल्लई आदी १३४ अधिका-यांच्या सरन्यायाधीशांना पाठवलेल्या पत्रावर स्वाक्ष-या आहेत. या पत्रात माजी अधिका-यांनी गुजरात सरकारच्या निर्णयामुळे देशात नाराजी आहे. आम्ही तुम्हाला पत्र लिहिले, कारण आम्ही गुजरात सरकारच्या या निर्णयामुळे प्रचंड व्यथित आहोत आणि आमचा विश्वास आहे की केवळ सर्वोच्च न्यायालयाचेच अधिकार क्षेत्र आहे, ज्याद्वारे ते हा चुकीचा निर्णय सुधारला जाऊ शकतो, असे म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण इतके तातडीचे का मानले की दोन महिन्यांतच निर्णय घ्यावा लागला, याचे आम्हाला आश्चर्य वाटते. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी सध्याच्या धोरणानुसार नाही तर गुजरातच्या १९९२ च्या कर्जमाफीच्या धोरणानुसार केली जावी, असे आदेश दिले. असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

निर्णयाला सर्वोच्च
न्यायालयात आव्हान
गुजरात सरकारच्या निर्णयामुळे गुजरातसह देशातील राजकारण तापले आहे. यानंतर आता बिल्किस बानो प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. गुजरात सरकारने दोषींची सुटका करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या