पाटणा : बिहारच्या ८ जिल्ह्यांमध्ये वादळ आणि वीज कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ४ लाख रुपये देण्याची घोषणा केली.
बिहारमध्ये मान्सूनचा पाऊस दाखल झाल्यानंतर संपूर्ण राज्यात ३ ते ४ दिवसांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार बिहारमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार १५ जूनपासून बिहारमध्ये पावसाला सुरुवात झाली. बिहारमधील सीमांचलमधील अररिया, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, सुपोल जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस सुरु झाला आहे.
शनिवारी रात्री आणि रविवारी वादळ आणि वीज कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला. भागलपूरमध्ये ६, वैशालीमध्ये ३, खंगडियामध्ये २, कटिहारमध्ये १, सहरसा १, मधेपुरा १ आणि मुंगेरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला.