22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeराष्ट्रीयबीएसएनएलची आता गावोगाव ४ जी सेवा

बीएसएनएलची आता गावोगाव ४ जी सेवा

एकमत ऑनलाईन

१.६४ लाख कोटींचे पॅकेज, ४ जी सेवांचा विस्तार करणार
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने बीएसएनएलसाठी १.६४ लाख कोटी रुपयांचे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. या माध्यमातून बीएसएनएल सेवांचा दर्जा सुधारण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच कंपनीची फायबर पोहोच वाढवण्याचाही प्रयत्न आहे. या पॅकेजनंतर बीएसएनएल एआरपीयू १७०-१८० रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी ४ जी सेवांचा विस्तार करू शकणार आहे. अर्थात, ग्रामीण भागापर्यंत ४ जी सेवा देण्यासाठी २६ हजार ३१६ कोटींचा अतिरिक्त निधी केंद्राने दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागात ४ जी नेटवर्क मजबूत केले जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने २५ हजार गावांसाठी २६ हजार ३१६ कोटींचा अतिरिक्त निधी दिला आहे. केंद्राकडून बीएसएनएलला आवश्यक ते स्पेक्ट्रम देण्यात येणार आहे. तसेच ४ जी सेवेचा प्रसार करण्यासाठी आवश्यक तो वित्तपुरवठा केला जाणार आहे. ग्रामीण भागातदेखील ४ जी नेटवर्क मजबूत करणार आहे.

केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले की, सरकारने बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी १.६४ लाख कोटींचे पुनरुज्जीवन पॅकेज मंजूर केले आहे. यामुळे टेलिकॉम कंपनीला ४ जीवर अपग्रेड होण्यास मदत होणार आहे. बीएसएनएलचे ६.८० लाख किमीपेक्षा जास्त ऑप्टिकल फायबर नेटवर्क आहे. तसेच १.८५ लाख ग्रामपंचायतींत ५.६७ लाख किलोमीटर ऑप्टिकल फायबर टाकले आहे. या माध्यमातून ४ जी सेवा दिली जाणार आहे. याशिवाय मंत्रिमंडळाने भारत संचार निगम लिमिटेड आणि भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड यांच्या विलीनीकरणालादेखील मंजूरी दिली.

सीमावर्ती भागात ४ जी सेवा
सीमेवर असणा-या लडाखमध्येही ४ जी सेवा आणली जाणार आहे. रक्षा मंत्रालय, गृह मंत्रालय आणि कम्युनिकेशन मंत्रालय सीमावर्ती भागात ४ जी सेवा कशी आणता येईल, याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या