30.1 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeराष्ट्रीयबीएसएनएल देणार एअरटेल, जिओला टक्कर

बीएसएनएल देणार एअरटेल, जिओला टक्कर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली, वृत्तसंस्था :
खासगी क्षेत्रातील जिओ आणि एअरटेल या दूरसंचार कंपन्यांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने टी. सी. एस. आणि सी. डॉटच्या नेतृत्वाखालील टीम शॉर्टलिस्ट केली आहे. लवकरच देशभरात या माध्यमातून ५ जी सेवा सुरू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी दिली.

ओडिशामध्ये ५ जी सर्व्हिस लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. बीएसएनएल देशभरात २०२४ मध्ये ५ जी सेवा सुरू करणार असल्याचे सांगत ते म्हणाले, मोदी सरकारने राज्यातील दूरसंचार कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी ५६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ओडिशातील १०० गावांमध्ये ५ जी सेवांसाठी १०० टॉवर्स सुरू करण्यात आले आहेत. संपूर्ण ओडिशात २ वर्षांत ५ जी सेवा सुरू होईल. राज्यात जागतिक दर्जाच्या संपर्क सुविधा असलेले ५००० मोबाइल टॉवर्स बसवले जातील असेही वैष्णव यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या