25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीय‘बुलडोजर’विरोधात कोर्टात जाणार

‘बुलडोजर’विरोधात कोर्टात जाणार

एकमत ऑनलाईन

भोपाळ : मध्यप्रदेशातील खरगोन येथे उसळलेल्या जातीय आणि धार्मिक हिंसाचारानंतर राज्य सरकारने कथित दंगेखोरांच्या घरांवर बुलडोजर घालत ती पाडून टाकली होती. या कारवाईविरोधात मुस्लिम समुदायाने आता उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करून ही मोहीम राबविण्यात आल्याचा आरोप स्थानिक मुस्लिमांकडून करण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या या कारवाईनंतर अनेक लोक बेघर झाले असून ज्या लोकांचा दंगलींशी काही संबंधच नाही अशांना राज्य सरकार का त्रास देत आहे? असा सवाल स्थानिक मुस्लिम धर्मगुरूंकडून विचारला जात आहे. १० एप्रिल रोजी रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान अनेक खरगोन शहरात दगडफेक झाल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या