23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयआजपासून १८ वर्षांवरील सर्वांना डोस घेता येणार

आजपासून १८ वर्षांवरील सर्वांना डोस घेता येणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाच्या बूस्टर डोसच्या किमतीत कमालीची घट झाली आहे. बूस्टर डोसची किंमत १२०० रुपयांवरून २२५ रुपये करण्यात आली आहे. भारत बायोटेकच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा एला यांनी ही माहिती दिली. कोवॅक्सिनची किंमत खाजगी रुग्णालयांसाठी २२५ रुपये करण्यात आली आहे. तसेच सीरमनेदेखील कोविशिल्ड लसीची किंमत निम्म्याहून अधिक कमी केली आहे. ज्यांना दोन डोस देऊन ९ महिने पूर्ण झाले, अशा १८ वर्षांवरील सर्वांना रविवार, दि. १० एप्रिलपासून बूस्टर डोस घेता येणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने खाजगी रुग्णालयांसाठी कोविशिल्ड लसीची किंमत ६०० रुपयांवरून २२५ रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे पूनावाला यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर सीरमने खाजगी रुग्णालयांसाठी कोविशिल्ड लसीची किंमत ६०० रुपयांवरून २२५ रुपये प्रतिडोस करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. १८+ वयोगटासाठी बुस्टर डोस देण्याच्या केंद्राच्या या निर्णयाचे पुन्हा एकदा कौतुक आहे, असेही त्यांनी म्हटले.
केंद्र सरकारने कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. उद्या रविवारपासून (दि. १०) देशातील १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रौढ व्यक्ती खाजगी केंद्रात जाऊन १० एप्रिलपासून बूस्टर डोस घेऊ शकतात. ज्या लोकांनी ९ महिन्यांपूर्वी लसीचा दुसरा डोस घेतला आहे, ते या तिस-या लसीसाठी पात्र असतील, असे सांगण्यात आले.

बूस्टर डोस महत्त्वाचा
कोरोना व्हायरसचे आतापर्यंत डेल्टा, डेल्टा प्लस, ओमिक्रोन, डेल्टाक्रॉन, एक्सई, कॅप्का प्रकार आले आहेत. त्यानंतरही आणखी व्हायरस येण्याचा धोका आहे. त्यातच दोन डोसने कालांतराने रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. त्यामुळे तिसरा डोस आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. लसीकरणामुळे गंभीर आजार, रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.

 

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या