26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeक्रीडाबॅडमिंटनमध्येही पदक निश्चित

बॅडमिंटनमध्येही पदक निश्चित

एकमत ऑनलाईन

सिंगापूरवर मात करीत फायनलमध्ये धडक
बर्मिंगहॅम : कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी आपली शानदार कामगिरी कायम ठेवली आहे. सांघिक स्पर्धेत सिंगापूरवर विजय मिळवत भारताने फायलनमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे भारताचे आणखी एक पदक निश्चित झाले आहे. सिंगापूरला ३-० ने मात दिल्यानंतर आता फायनलमध्ये भारत मलेशियाविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

सिंगापूरविरुद्धच्या सामन्यात सर्वात आधी पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या प्रसिद्ध जोडीने सिंगापूरच्या योंग ही आणि अँडी क्विक या जोडीवर २१-११ आणि २१-१२ अशा सोप्या फरकाने विजय मिळवत भारताला सामन्यात १-० ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर महिला एकेरीचा सामना पार पडला. यामध्ये भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने सिंगापूरच्या जिया मिन यू ला २१-११ आणि २१-१२ अशा सरळ सेट्समध्ये मात देत विजय मिळवला. नंतर पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने किन य्वूला २१-१८, २१-१५ च्या फरकाने मात देत सामना जिंकलाच आणि भारतालाही ३-० च्या फरकाने विजय मिळवून दिला. आता भारत सुवर्णपदक मिळवण्यासाठी मलेशियाविरुद्ध अंतिम सामना खेळेल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या