25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयबैलगाडा शर्यतींना पुन्हा खीळ?

बैलगाडा शर्यतींना पुन्हा खीळ?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : तामिळनाडूतील जल्लीकट्टू खेळ आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती विरोधातील याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलण्यास बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे या शर्यतींना पुन्हा खिळ बसण्याची शक्यता वाढली आहे.

या याचिकांमध्ये तामिळनाडू आणि महाराष्ट्र सरकारच्या या खेळांशी संबंधित कायद्यांना आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी संकलित अहवाल सादर करायचा असल्याने तामिळनाडू सरकारच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयाला हिवाळी सुट्ट्यांनंतर जल्लीकट्टू वरील सुनावणी घेण्याची विनंती केली होती.

त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्या. के. एम. जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश दिले. जल्लीकट्टू जानेवारीमध्ये होणार आहे, त्यामुळे आम्हील सुनावणी पुढे ढकलणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने जल्लीकट्टूविरोधातील याचिकांवर २३ नोव्हेंबर रोजी सुनावणी निश्चित केली होती. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठात न्या. जोसेफ, न्या. अजय रस्तोगी, न्या. अनिरुद्ध बोस, न्या. हृषिकेश रॉय आणि न्या. सीटी रविकुमार यांचा समावेश आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या