परभणी : येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारमधून नेण्यात येणारा सहा बॉक्स देशी दारूसह ०१ लाख १७ हजार २८० रूपयांचा मुद्देमाल जप्त केलाÞ पथकाने ही कारवाई शुक्रवार, दिÞ१५ एप्रिल रोजी रात्री केलीÞ या प्रकरणी एका आरोपीवर ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि साईनाथ पुयड, पोलिस कर्मचारी बालासाहेब तुपसुंदरे, दिलावर खान, शेख अजहर, हरिश्चंद्र खुपसे, संतोष सानप, घुगे यांच्या पथकाने अवैध धंद्याची माहिती काढत गस्त घालत असताना या पथकाला बोबडे टाकळी येथे एक इसम चारचाकी वाहनातून दारू घेऊन जात असल्याची माहिती मिळालीÞ पोलिसांनी एम. एच. ०९ एएफ ९२६९ या क्रमांकाचे वाहन थांबवून विचारपूस केली असता संबंधिताने संजय भगवान गडोळे असे नाव सांगितले. वाहनाची तपासणी केली असता त्यात १७ हजार २८० रूपये किंमतीचे सहा देशी दारू बॉक्स आढळून आले. पोलिसांनी वाहनासह दारू जप्त केली आहे. आरोपी गडाळे याच्या विरोधात ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.