24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeक्रीडाभर मैदानात अश्विन आणि अम्पायरमध्ये वाद

भर मैदानात अश्विन आणि अम्पायरमध्ये वाद

एकमत ऑनलाईन

कानपूर : भारत विरुद्ध न्यूझिलंड यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या टेस्टच्या तिस-या दिवशी टीम इंडियाचा स्पिन बॉलर आर. अश्विनचा अम्पायरशी वाद झाला. अश्विन राऊंड द विकेट बॉलिंग करत होता. त्यावेळी तो सरळ न जाता अम्पायरच्या समोरून क्रॉस जात होता. यावर अम्पायरने आक्षेप घेतला. त्यानंतर दोघांमध्ये चर्चा झाली. अम्पायर नितीन मेनन यांनी यावेळी अश्विनशी चर्चा केली.

न्यूझिलंडच्या इनिंगमधील ७७ व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. यावेळी अम्पायरने अश्विनला रोखले आणि त्याला इशारा दिला. अश्विन डेंजर एरियामध्ये येत असल्याची सूचना अम्पायरने केली. पण, टीव्ही रिप्लेमध्ये तो या भागापासून दूर असल्याचे स्पष्ट दिसत होते. अश्विनच्या फॉलो थ्रूमुळे बॉल पाहण्यास त्रास होत असल्याचा आक्षेप अम्पायरने घेतला. या मुद्यावर अश्विनने त्याची बाजू अम्पायरकडे मांडली. टीम इंडियाचा कॅप्टन अजिंक्य रहाणेने देखील यावेळी अम्पायरकडे धाव घेत अश्विनसोबत त्यांच्याशी चर्चा केली.

द्रविडने घेतली रेफ्रीची भेट
मैदानात हा सर्व प्रकार सुरू असतानाच टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने मॅच रेफ्री जवागल श्रीनाथ यांची त्यांच्या केबिनमध्ये जाऊन भेट घेतल्याचे टीव्हीवर दाखवण्यात आले. द्रविडने कोणत्या मुद्यावर श्रीनाथशी चर्चा केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, त्यांच्या भेटीतही या वादाचा विषय निघाला असल्याची दाट शक्यता आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या