26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeराष्ट्रीयभाईंदरच्या खाडीत आफताबच्या मोबाइलचा शोध

भाईंदरच्या खाडीत आफताबच्या मोबाइलचा शोध

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशाला थरकाप उडवून देणा-या श्रद्धा वालकर हत्याकांडाप्रकरणी दिल्ली व महाराष्ट्र पोलिसांच्या पथकाने गुरुवारी मीरा भाईंदरच्या खाडीत दिवसभर आफताबच्या मोबाईलाच शोध घेतला. रात्र झाल्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली आहे. श्रद्धा बेपत्ता झाल्यानंतर वसईच्य माणिकपूर पोलिसांनी आफताबला गेल्या महिन्यात चौकशीसाठी बोलावले होते. तेव्हा त्याने आपल्या २ पैकी एक मोबाइल येथे फेकला होता.

आफताबची पॉलीग्राफ टेस्ट सुरू
या घडामोडीत आरोपी आफताबच्या पॉलीग्राफ चाचणीचा दुसरा टप्पा सुरू झाला. ही टेस्ट दिल्लीच्या रोहिणी स्थित न्यायवैद्यक प्रयोगशाळेत होत आहे. सर्दी-तापीमुळे बुधवारी ही टेस्ट पूर्ण झाली नव्हती. या टेस्टमुळे आफतबाची नार्को टेस्ट लांबली आहे. ही टेस्ट पॉलीग्राफची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर होण्याची शक्यता आहे.

वेगवेगळ््या हत्यारांनी केले तुकडे
आरोपी अफताबने वेगवेगळ्या हत्यारांनी श्रद्धाच्या शरिराचे तुकडे केले होते. खुद्द अफताबनेच पॉलिग्राफी टेस्ट दरम्यान ही माहिती दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या पथकाने आफताबने सांगितलेल्या ठिकाणांनुसार ५ मोठे चाकू जप्त केले होते. ही हत्यारे फॉरेन्सिक टीमकडे तपासासाठी पाठवण्यात आली आहेत.

हा सगळा घटनाक्रम सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदाच गुरुवारी आपली या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. दे म्हणाले माझी या प्रकरणावर करडी नजर आहे. श्रद्धाची हत्या करणा-याला कमीत कमी कालावधीत कठोर शिक्षा दिली जाईल. यासाठी दिल्ली पोलिसांशी मी सातत्याने संपर्कात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या