पंजाब : भाजपने पंजाब विधानसभेसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत २७ उमेदवारांची नावे देण्यात आली आहेत. यापूर्वी भाजपने ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. एकूण ११७ जागांपैकी भाजप ६५जागा, कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाब लोक काँग्रेस ३७ आणि शिरोमणी अकाली दल (युनायटेड) १५ जागा लढविणार आहेत.
भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर आणि भाजपचे गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तू-तू-मैं-मैं रंगलेली पाहायला मिळाली.
त्यावरूनच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप वगळून सर्व पक्षांना एक विनंती केली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाब विधानसभा निवडणुक लढण्याबाबत याआधी मोठी घोषणा केली होती. २०२२ मध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत ते पटियाला मतदारसंघातून लढणार असल्याचे त्यांनी घोषित केले. पटियाला मतदारसंघ हा त्यांचा पारंपारिक बालेकिल्ला मानला जातो.