27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रभाजपचे शिष्टमंडळ आज दिल्लीत

भाजपचे शिष्टमंडळ आज दिल्लीत

एकमत ऑनलाईन

केंद्रीय गृह सचिवांची घेणार भेट, सोमय्या यांचे ट्विट
मुंबई : राज्यातील राजकीय वाद पुन्हा दिल्लीत जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यासह भाजपचे शिष्टमंडळ केंद्र सरकारचे गृह सचिव यांची भेट घेणार आहेत. किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे भाजपमधील नेते संतप्त आहेत. त्यामुळे ते महाविकास आघाडी आणि पोलिसांविरोधात तक्रार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसैनिकांनी मला संपण्यासाठी पुन्हा माझ्यावर हल्ला केला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. त्यामुळे पुन्हा केंद्रीय यंत्रणा राज्यातील प्रकरण हाताळणार, असे चित्र निर्माण झाले आहे.

भाजपच्या शिष्टमंडळामध्ये आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, आमदार पराग शाह, आमदार राहुल नार्वेकर आणि भाजप महापालिका नेता विनोद मिश्रा यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली. त्यामुळे उद्या पुन्हा एकदा यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगणार हे स्पष्ट झाले आहे.

उद्या १०.१५ वा. भाजपचे शिष्टमंडळ ृनॉर्थ ब्लॉक दिल्ली येथे केंद्र सरकारचे गृह सचिव यांना शिवसेनेच्या गुंडांनी मला केलेल्या मारहाण प्रकरणासंबंधात कारवाईसाठी भेटणार आहे, असे ट्विट भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केले. आता राज्यातील वातावरण पुन्हा ढवळून निघणार की काय असा सवाल उपस्थित होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या