22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रभाजपला ‘चित्ता सरकार’ म्हणायचं का?

भाजपला ‘चित्ता सरकार’ म्हणायचं का?

एकमत ऑनलाईन

मुंबई : आज अनेक वर्षांनी आपल्या देशामध्ये चित्ता हा प्राणी आला आहे. मराठीमध्ये आपण त्याला चित्ता बोलतो आणि इंग्लिशमध्ये चिता बोलतात. आम्ही पेंग्विन आणले म्हणून ते आम्हाला पेंग्विन सरकार म्हणतात. मग आम्ही त्यांना चित्ता सरकार म्हणायचे का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला आहे.

दरम्यान भारतात ७० वर्षांनी चित्ता आणण्यात आला आहे. यावरून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला आहे. सत्तर वर्षानंतर भारतात प्रथमच चित्ता आल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यावरून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि भाजपाला खोचक टोला लगावला आहे.

त्यांनी यावेळी प्रताप सरनाईक यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. प्रताप सरनाईक यांची केस लोकशाहीपेक्षाही मोठी आहे. मग केस मागे घेण्याची घाई का? असा सवालही ठाकरे यांनी विचारला आहे. प्रताप सरनाईक शिंदे गटासोबत गेल्याने शिंदे सरकार त्यांची केस मागे घेण्याची घाई करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या