24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeराष्ट्रीयपोटनिवडणुकीत छत्तीसगड-महाराष्ट्रात काँग्रेसला यश

पोटनिवडणुकीत छत्तीसगड-महाराष्ट्रात काँग्रेसला यश

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली/मुंबई : बंगालमधील आसनसोल लोकसभा आणि चार विधानसभेच्या जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाची निराशा झाली असून, बिहारमधील बोचहान जागेवर प्रतिस्पर्धी आरजेडीने निर्णायक आघाडी घेतली आहे. या शिवाय छत्तीसगड आणि महाराष्ट्रात काँग्रेसला फायदा होताना दिसत आहे.

छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील खैरागढ विधानसभा जागेवर काँग्रेसची वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. काँग्रेस उमेदवाराच्या आघाडीने ५००० मतांचा टप्पा ओलांडला असून, त्यांचा विजय निश्चित झाला आहे. इथे झालेल्या पोटनिवडणुकीत सुमारे ७८ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. काँग्रेसने निवडणूक प्रचारादरम्यान खैरागडला नवा जिल्हा करण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जनता काँग्रेस छत्तीसगडचे (जोगी) आमदार देवव्रत सिंह यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक घ्यावी लागली होती.

बंगालमध्येही टीएमसीची विजयाकडे वाटचाल
सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आसनसोलमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार, अभिनेता आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा आघाडीवर आहेत. तर, भाजप सोडून तृणमूलमध्ये दाखल झालेले बाबुल सुप्रियो बालीगंज विधानसभा मतदारसंघात पुढे आहेत. बिहारमधील बोचहान जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत आरजेडीने निर्णायक आघाडी घेतली आहे. सध्या मतमोजणीच्या नऊ फे-या संपल्या आहेत. आरजेडीच्या अमर पासवान यांना २६६२३, भाजपच्या बेबी कुमारीला १५००३ आणि व्हीआयपी उमेदवाराला १३५१२ मते मिळाली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या