28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयभाजप आमदारासह मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

भाजप आमदारासह मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

आग्रा : उत्तर प्रदेशमधील आग्रा जिल्ह्यातील फतेहाबाद विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार छोटे लाल वर्मा आणि त्यांचा मुलगा लक्ष्मीकांत वर्मा यांच्याविरोधात शारीरिक छळ आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मीकांतच्या पत्नीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून वडिलांविरुद्ध भादंवि कलम ३७६ (बलात्कार), ३१३ (गर्भपात घडवून आणणे), ३२३ (मारहाण), ५०४ (अत्याचार), ५०६ (ठार मारण्याची धमकी), ४९४ (पहिली पत्नी हयात असताना दुसरे लग्न करणे), ३२८ (विष किंवा मादक पदार्थ खायला देणे) या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेच्या आरोपांनुसार, जेव्हा ती १७ वर्षांची होती. तिला भेटण्यासाठी वर्मा यांच्या घरी जात असे. तेव्हा वर्मा यांच्या मुलीने पीडितेची लक्ष्मीकांत वर्मा याच्याशी ओळख करून दिली. २००३ मध्ये लक्ष्मीकांतने पीडितेला घरी बोलवून तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हीडीओ देखील बनवला. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून ब्लॅकमेल केले. यात छोटे लाल वर्मा यांनी लक्ष्मीकांत याची या सगळ्यात साथ दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

लक्ष्मीकांतने पीडितेला अनेकदा मारहाण केली. तिचा जबरदस्तीने गर्भपात देखील करवला. त्यानंतर एका मंदिरात या दोघांनी लग्न केले. मात्र, लक्ष्मीकांतने २००६ मध्ये दुस-या महिलेशी लग्न केले. त्यानंतरही पीडितेवर अत्याचार करत राहिला. त्याने तिच्या मुलांनाही मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पोलिसांनी या दोघांविरोधात बलात्कार, गर्भपात करवणे, मारहाण, शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी देणे, पहिली पत्नी हयात असताना दुसरा विवाह करणे आणि विषप्रयोग किंवा अमली पदार्थ खाऊ घालणे अशा विविध आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या