22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयभाजप नेत्या सोनाली फोगाट यांची हत्या?

भाजप नेत्या सोनाली फोगाट यांची हत्या?

एकमत ऑनलाईन

पणजी : भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने गोव्यात निधन झाले. आता त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. सोनालीच्या भगिनी रूपेश यांनी सोनालीने आईकडे आपल्या जेवणात काही तरी गडबड असल्याचा संशय व्यक्त केला होता. तसेच त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता कुटुंबीयांनी फोगाट यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

आमचे परवाच बोलणे झाले होते. त्या ठणठणीत आपल्या फार्म हाऊसवर होत्या. पण आईशी बोलताना त्यांनी आपल्या शरीरात काही तरी गडबड असल्याचा संशय फोगाटच्या भगिनीने व्यक्त केला. जसे कुणी काहीतरी त्यांना केले. काहीतरी गडबड वाटत आहे. काल सायंकाळीही सोनालीने आईशी याच मुद्यावर चर्चा केली. तेव्हाही तिने आपल्याविरोधात कुणीतरी कट रचत असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर आज सकाळी तिचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची बातमी आली. सोनालीच्या जाऊ मनोज फोगाट यांनी सांगितले की, त्या परवाच घरी आल्या होत्या. येथूनच त्या कोणत्याही कामाच्या निमित्ताने मुंबई व गोव्याला गेल्या होत्या. सोनालीला एक मुलगी असून, ती हॉस्टेलमध्ये राहते.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या