26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रभाजप-राष्ट्रवादीची २०१७ मध्येच युतीची चर्चा

भाजप-राष्ट्रवादीची २०१७ मध्येच युतीची चर्चा

एकमत ऑनलाईन

भाजप नेते आशिष शेलार यांचा गौप्यस्फोट
मुंबई : गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून राज्यात सर्वाधिक राजकीय चर्चा झाली असेल तर ती शिवसेना आणि भाजपाच्या तुटलेल्या युतीची आणि शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनैसर्गिक वाटणा-या अशा आघाडीची. पण यासोबतच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येण्याआधी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी भल्या सकाळी घेतलेल्या शपथविधीचीदेखील जोरदार चर्चा रंगली. अजूनही ही चर्चा रंगते. मात्र, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये २०१७ मध्येच युतीसंदर्भात चर्चा झाली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट आशिष शेलार यांनी केला.

शिवसेनेसोबतच्या तुटलेल्या युतीसंदर्भात विचारणा केली असता दिलेल्या उत्तरात आशिष शेलार यांनी हा गौप्यस्फोट केला. एका मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीच्याही दोन वर्ष आधी अर्थात २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीसंदर्भात अंतिम बोलणीदेखील झाल्याचे ते म्हणाले. भाजपाला २०१७ मध्येच राष्ट्रवादीसोबत युती करावी अस वाटू लागले होते, असे आशिष शेलार म्हणाले.
२०१७ चा काळ होता. जेव्हा भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला युती करावी असे वाटू लागले. शिवसेनेचे रोज खिशात राजीनामे आणि तोंडात जहर अशी त्रास देण्याची भूमिका असताना राज्यात राष्ट्रवादी आणि भाजपा असे सरकार करावे, अशी चर्चा झाली. पालकमंत्रीदेखील ठरले. त्यानंतर पुन्हा भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने ठरवले की आपण तीन पक्षांचे सरकार करू, असे आशीष शेलार यांनी सांगितलं.

तरच राष्ट्रवादीसोबत युती
२०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने युती करायला नकार दिल्याचे आशिष शेलार यावेळी म्हणाले. आम्ही तेव्हा म्हटले तीन पक्षांचे अर्थात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे सरकार करू. पण तेव्हा राष्ट्रवादीने याला नकार दिला. आमचे शिवसेनेशी जमूच शकत नाही. राष्ट्रवादी भाजपासोबत येत असताना भाजपाने शिवसेनेला सोडायला नकार दिला. पण २०१९ ला सत्ता दिसल्यावर शिवसेनेने भाजपाला सोडायची भूमिका सहज घेतली, असे आशिष शेलार म्हणाले.

राष्ट्रवादीवर निशाणा
आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरदेखील निशाणा साधला. राष्ट्रवादीने ज्या शिवसेनेसोबत जमूच शकत नाही, असे तेव्हा म्हटले, त्यांनी आता शिवसेनेशी अशी सलगी केली की जत्रेतले दोन भाऊ हरवले होते, असे वाटावे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका किती महिन्यात किती वर्षात बदलते, याची साक्षीदार भाजपा आहे, अशा शब्दांत आशिष शेरार यांनी निशाणा साधला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या