21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeक्रीडाभारताचा लाजीरवाणा पराभव

भारताचा लाजीरवाणा पराभव

एकमत ऑनलाईन

 

इंग्लंडने साधली मालिकेत बरोबरी
लंडन : भारत आणि इंग्लंडदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी लंडनमधील ऐतिहासिक लॉर्डस क्रिकेट स्टेडियमवर झाला. या सामन्यात भारताचा १०० धावांनी लाजीरवाणा पराभव झाला. दुस-या सामन्यात शानदार विजय मिळवित इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

इंग्लंडच्या एकट्या रीस टॉपलीने भारताच्या सहा फलंदाजांना बाद केले. त्यामुळे भारताचा सर्व संघ १४६ धावांमध्येच गुंडाळला. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २४६ धावा केल्या. त्यामुळे भारतासमोर २४७ धावांचे लक्ष्य होते. मात्र, भारताची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. सलामीवीर रोहित शर्मा शुन्यावर बाद झाला. त्यानंतर भारताचा डाव गडगडला. शिखर धवन, विराट कोहली, ऋषभ पंत हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. पंतही शून्यावरच परतला. त्यानंतर सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांनी काही अंशी भर टाकली. मात्र, ही जोडी परतताच जडेजा, मोहमद शमी काही वेळ झगडले. परंतु त्यांनाही फारवेळ टिकाव धरता आला नाही. त्यामुळे भारतीय संघाला सर्वबाद १४६ पर्यंतच मजल मारता आली. यात भारताच तब्बल १०० धावांनी लाजीरवाणा पराभव झाला. पहिल्या सामन्यातील दारुण पराभव विसरून इंग्लंडच्या संघाने शानदार कामगिरीचे प्रदर्शन करीत शानदार विजय मिळविला. तीन सामन्याच्या मालिकेत इंग्लंडने बरोबरी साधली. त्यामुळे तिस-या आणि अखेरच्या सामन्यात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी पुन्हा शानदार कामगिरी करत इंग्लंडला २४६ धावांमध्ये गुंडाळले होते. भारताच्या वतीने युझवेंद्र चहलने सर्वाधिक चार बळी घेतले. त्यामुळे भारताला मालिका विजयाची संधी चालून आली होती. परंतु इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताला सुरुवातीपासूनच धक्के देत विजयी घोडदौड रोखली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या