22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeक्रीडाभारताचा विजय पाच पावले दूर

भारताचा विजय पाच पावले दूर

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारत-न्यूझिलंड कसोटीच्या तिस-या दिवशी भारतीय संघाचेच वर्चस्व पाहायला मिळाले. मयांक अगरवालच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने आपला दुसरा डाव २७६ धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडपुढे ५४० धावांचे मोठे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करणारा न्यूझीलंडचा अर्धा संघ यावेळी गारद झाला आणि त्यांना १४० धावा करता आल्या. त्यामुळे भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर असून त्यांना चौथ्या दिवशी विजयासाठी पाच विकेट्सची गरज आहे. दुस-या डावात अश्विनने तीन आणि अक्षर पटेलने एक बळी मिळवला आहे.
मयांक अगरवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी तिस-या दिवसाची चांगली सुरुवात केली.

पहिल्या डावात दीडशतक झळकावणा-या मयांक अगरवालने यावेळी आपले अर्धशतकही पूर्ण केले. न्यूझीलंडच्या एजाज पटेलने दुस-या डावातही मयांकला बाद केले. मयांकने यावेळी ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६२ धावांची खेळी साकारली. मयांक बाद झाल्यावर पुजारा अर्धशतकासमीप पोहोचला होता. मात्र, त्याचे अर्धशतक फक्त तीन धावांनी हुकले. एजाज पटेलनेच यावेळी पुजाराला बाद केले. आज कोहलीही ३६ धावा काढून बाद झाला, तर अक्षर पटेलने ४१ धावा केल्या आणि भारताने २७६ धावांवर आपाल दुसरा डाव घोषित करत न्यूझीलंडपुढे ५४० धावांचे मोठे आव्हान ठेवले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अवघ्या १४० धावांत ५ विकेट गेल्या. त्यामुळे न्यूझीलंड पराभवाच्या छायेत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या